Ganeshprasad Gogate
या मंदिराची संरचना सरळ आणि शानदार असून येथे एक मोठे सभागृह आहे. या सभागृहात अंदाजे 500 लोक उभे राहू शकतात.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मध्यात एक भव्य सात मजली दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ गोव्यातील सर्वात उंच दीपस्तंभ आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, मोंगरी डोंगरातील हे मंदिर 18 व्या शतकात निर्माण करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा दरबारातील आपले गोमंतकिय मंत्री श्री. रामचंद्र मल्हार सुखठणकर यांच्या विनंतीवरून 1744 साली भव्य अशा मंदिराची बांधणी केली.
मंदिराला सुबक अशी तळी आहे, नगारखाना आहे.
जाणकारांच्या मते, मंदिराला पोर्तुगालांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शिवलिंगला मूळ मंदिरातून प्रियोलच्या सध्याच्या ठिकाणावर स्थलांतरित केले