Akshay Nirmale
उद्योगपती रतन टाटांची त्यांच्या घर, हॉटेल, कार्यालय परिसरातील भटक्या कुत्र्यांशी घट्ट मैत्री आहे. ही कुत्री त्यांच्याभोवती गराडा घालतात. टाटा या कुत्र्यांसाठी नेहमी खाऊ घेऊन येतात.
टाटा समुहाचे जागतिक मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊस येथील एक काळ्या-पांढऱ्या रंगाचा कुत्रा मात्र टाटांचा खास आहे.
हा भटका कुत्रा असून टाटांनी त्याला दत्तक घेतले आहे. या कुत्र्याचे नाव आहे गोवा. या नावाचीही खास कहाणी आहे.
हा गोवा टाटांची आज्ञाही पाळतो. विशेष म्हणजे बॉम्बे हाऊसमध्ये गोवा चक्क टाटा यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसतो.
टाटांनी सांगितलेले सर्व काही तो ऐकतो. एखाद्या माणसाशी संवाद साधावा तसे टाटा या गोवाशी साधतात.
2020 मध्ये टाटांनी त्यांच्या या आवडत्या कुत्र्याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती.
गोव्यात टाटांच्या एका सहकाऱ्याच्या गाडीखाली हा कुत्रा आला होता. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर त्याला तिथूनच गाडीतून मुंबईत बॉम्बे हाऊसमध्ये आणले गेले. तेव्हापासून त्याचे नाव गोवा पडले होते.