Akshay Nirmale
गोव्यात पूर्वी काजुचे बोंडू पायाने मळून रस काढला जायचा. आता दाब मशीनद्वारे बोंडूंचा रस काढून तो भाटीमध्ये मडक्यात घालून हुर्राक, फेणी बनवली जाते.
पाणी घालून फेणी करण्याची प्रक्रिया केली जाते. पारंपरिक पध्दतीने काही ठिकाणी रस काढला जातो. या यंत्राद्वारे बोंडूचा रस काढल्याने पूर्ण रसाचे गाळप होते.
रस निघाल्यानंतर बोंडूचा शिल्लक चोथा पुन्हा मशीनमध्ये घालून दाब दिला जातो. असा पूर्ण गाळलेला रस मडक्यात घालून फेणीची प्रक्रिया केली जाते.
काजू बागायतदार बोंडू रस काढून फेणी भट्टीवर (स्थानिक भाषेत आवार) आणून देतात. काहीजण केवळ बोंडू विक्री करतात.
बोंडू रसाचा पंधरा लिटरचा डबा पन्नास ते साठ रुपये दराने तर बोंडू फळ प्रति बादली वीस रुपये असा दर फेणी व्यावसायिक बागायतदारांना देतात.
दररोज आठवेळा काजू भट्टी पेटवली जाते. दिवसाला चार कॅन फेणी काढली जाते.
हे काम जबाबदारीने करावे लागते. कमी जास्त प्रमाण झाले तर फेणी निर्मितीवर परिणाम होऊन तोटा होऊ शकतो. फेणी तयार होण्यास तीन साडेतीन तास लागतात.