Akshay Nirmale
माडत (Terminalia Eliptica) हा देशी वृक्ष आहे. हा वृक्ष हजारो वर्षांपासून गोव्यात आढळत आहे. हा देशी जंगलाचे प्रतिनिधित्व करणारा वृक्ष आहे.
माडतच्या फुलांना माटोळी म्हणतात. गणेशोत्सवात आरास करताना माटोळी फुलांचा वापर केला जातो.
एखाद्या ठिकाणी माडत वृक्ष असेल तर त्या ठिकाणी पाणी आहे, असे समजले जाते.
माडतच्या पानांचा वापर विविध पिकांसाठी खत म्हणून केला जातो.
सुसोगड पर्वत परिसरात हा वृक्ष आढळून येतो. या झाडाचा बुंधा मगरीच्या पाठीसारखा असतो. त्यामुळे या झाडाला इंग्रजीमध्ये क्रोकोडाईल बार्क ट्री म्हणतात.
या झाडाच्या बुंध्यात पाणी साठवले जाते. त्याचा झाडाच्या अवतीभवतीच्या परिसंस्थेलाही फायदा होत अशतो.
या झाडाची साल अग्निरोधक असते. ती सहसा लवकर जळत नाही. जहाज बांधणीसाठी या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो.