Pranali Kodre
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात 16 जून 2023 पासून ऍशेस या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
दोन्ही संघांसाठी ही मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी कसोटी मालिका आहे. पण या मालिकेला ऍशेस हे नाव मिळण्यामागे तब्बल 141 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
ऍशेस हा शब्द क्रिकेटमध्ये आला तो 1882 साली, जेव्हा इंग्लंडचा संघ मायदेशात पहिल्यांदा द ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पराभूत झाला होता. इंग्लंडच्या पराभवाची तारिख होती 29 ऑगस्ट 1882.
इंग्लंडच्या या पराभवानंतर 'स्पोर्टिंग टाइम्स'या एका इंग्लिश वृत्तपत्रानं 'इंग्लिश क्रिकेटचे निधन' हे शीर्षक देताना शोक संदेश लिहिला होता.
स्पोटिंग टाईम्सच्या शोक संदेशात लिहिले होते की 'इंग्लिश क्रिकेटचे निधन झाले असून अंत्यसंस्कारानंतर राख ऑस्ट्रेलियाला नेली जाईल.'
त्यानंतर काही आठवड्यांनी ज्यावेळी इंग्लंडचा संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघाला, तेव्हा त्यावेळीचा कर्णधार इवो ब्लिंगने म्हटले की ऍशेस परत आणण्यासाठी चाललो आहे. तसेच ऑस्ट्रेलियन कर्णधार डब्ल्यूएल मर्डोचने ती राख आम्ही राखू असं म्हटलं
त्यानंतर इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली. त्यावेळी फ्लोरेन्स मॉर्फी या महिलने तिच्या मैत्रिणींसह तिच्या एका परफ्युम जारमध्ये स्टंपवरील बेल्स जाळल्यानंतरची राख भरून इंग्लंडच्या कर्णधाराला भेट म्हणून दिली. ज्याला आज ऍशेस अर्न (ऍशेस कप) म्हणून ओळखले जाते. ज्या ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात मालिका खेळली जाते.
दरम्यान, ऍशेस मालिकेनंतर या अर्नची फक्त प्रतिकृती संघाला दिली जाते.