Akshay Nirmale
वीरभद्र ही गोव्यातील एक सुप्रसिद्ध लोकनृत्य परंपरा आहे. वीरभद्र परंपरेला 550 वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.
वीरभद्र हे पौराणिक पात्र असून ते महादेवाने निर्माण केल्याचे सांगितले जाते. दक्ष याचे संपुर्ण साम्राज्य संतापलेल्या महादेवांनी नष्ट केले.
वीरभद्र हा त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मारत सुटला. त्याने महादेवासाठी दक्षाला मारले.
चैत्रोत्सवात वीरभद्र लोकनृत्याचे सादरीकरण केले जाते.
गोव्यातील साखळी येथे विठलापूर पांडुरंग देवस्थानात नुकतेच वीरभद्र परंपरेचे सादरीकरण झाले.
जळत्या चितेभोवती दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन वीरभद्र नृत्य करतो. यावेळी वीरभद्र हा त्याच्या ट्रान्समध्ये असतो.
कन्नड प्रांतातही वीरभद्र परंपरा असून कैलासवगीले, होंडू, वीरभद्र अण्णा या नावानेही ही परंपरा ओळखली जाते.