Pranali Kodre
आयसीसीने 2019 साली कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात केली होती.
दोन वर्षांच्या कालावधीत या स्पर्धेचे एक पर्व खेळवले जाते.
या स्पर्धेचे पहिले पर्व 2019 ते 2021 दरम्यान खेळवण्यात आले.
सध्या या स्पर्धेचे दुसरे पर्व खेळवण्यात येत आहे.
गेल्या दोन पर्वात या स्पर्धेत 9 संघ सामील झाले आहेत. हे 9 संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, बांगलादेश.
या 9 संघांना या स्पर्धेअंतर्गत 2 वर्षांच्या कालावधीत 3 मायदेशात आणि 3 परदेशात कसोटी मालिका खेळायच्या असतात.
या मालिकांमधील सामन्यांच्या निकालांवरून विजयाच्या टक्केवारीनुसार गुणतालिकेत संघांची क्रमवारी निश्चित होते.
त्यानुसार गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहणारे संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात.
त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी गुणही दिले जातात. जर संघांनी षटकांची गती कमी राखल्यास त्याचा परिणाम गुणांसह विजयाच्या टक्केवारीवरही होतो.
प्रत्येक संघाला विजयी सामन्यासाठी 12 गुण दिले जातात. तसेच बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी 6 गुण, अनिर्णित सामन्यासाठी 4 गुण दिले जातात. तर पराभूत संघाला एकही गुण मिळत नाही.
तसेच विजयी टक्केवारीबाबातही होते. विजय मिळवल्यास 100 टक्के, बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी 50 टक्के, अनिर्णित सामन्यासाठी 33.33 टक्के आणि पराभूत सामन्याला 0 टक्के अशी विभागणी केली जाते.
कसोटी चॅम्पियनशीप 2021-2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने स्थान पक्के केले आहे.