Akshay Nirmale
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संसदेत येताना हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून आले होते, त्याची खूप चर्चा झाली होती.
गडकरींच्या त्या कारनंतर आता देशात पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी बस धावली आहे.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमधील लेह येथे देशातील पहिली हायड्रोजन बस सुरू होणार आहे.
एनटीपीसी योजनेंतर्गत येथे ही बस सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच बसेस देण्यात येणार आहेत.
दरम्यान, एका हायड्रोजन बसची किंमत सुमारे 2.5 कोटी रूपये इतकी असते. शुन्य अंशाखालील तापमानातही त्या चालू शकतील, अशा प्रकारे त्या बनवल्या गेल्या आहेत.
तीन महिने टेस्टिंगनंतर या बसेस समुद्रसपाटीपासून 11 हजार फुट उंचीवर असलेल्या लडाखमध्ये आणल्या गेल्या. या बसेस प्रदूषण करत नाहीत.