'हे' आहेत नवीन संसद भवनाचे आर्किटेक्ट; 229 कोटी रूपये मेहनताना

Akshay Nirmale

आर्किटेक्ट बिमल पटेल

भारताच्या नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रोजेक्टने केले आहे. पण या इमारतीचे डिझाईन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. पटेल हे मूळचे अहमदाबादचे आहेत.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image

मूळचे गुजरातचे

पटेल यांचा जन्म 31 ऑगस्ट 1961 रोजी गुजरातमध्ये झाला. ते 35 वर्षांपासून आर्किटेक्चर, शहर रचना आणि शहर नियोजनाचे काम करत आहेत.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image

CEPT मधून पदवी

पटेल यांचे शिक्षण अहमदाबादच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी 1984 मध्ये पहिली व्यावसायिक पदवी घेतली.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image

पीएच.डी. पदवी

त्यानंतर पटेल बर्कले येथे गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइनमध्ये शिक्षण घेतले. 1995 मध्ये त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image

पहिल्याच कामाला पुरस्कार

पटेल यांनी सर्वप्रथम अहमदाबादमधील उद्योजकता विकास संस्थेची रचना केली. यासाठी त्यांना 1992 मध्ये आर्किटेक्चरसाठी आगा खान पुरस्कार मिळाला होता.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image

नवीन संसदेच्या कामासाठीचा मोबदला

बिमल पटेल यांच्या HCP Designs या फर्मला नवीन संसदेच्या कामासाठी 229.75 कोटी रूपये कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी दिले जाणार आहेत, असे कळते.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image

पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान

2019 मध्ये, स्थापत्य आणि नियोजनातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय पटेल यांना इतरही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Bimal Patel | Architect of New Parliament building | Google Image
worlds first romantic kiss | Dainik Gomantak