Akshata Chhatre
प्रत्येक महिलेला आपले केस लांब, घनदाट आणि सिल्की-स्मूथ असावे असे वाटते.
रूक्ष, निर्जीव आणि झाडूंसारखे दिसणारे केस आत्मविश्वास कमी करतात.
महागड्या शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करूनही फरक पडत नसेल, तर केसांसाठी नैसर्गिक, आयुर्वेदिक उपायांचा वापर करणे सर्वात चांगले आहे.
आयुर्वेदिक डॉक्टरांनीं सांगितलेल्या या खास नुसख्यासाठी तुम्हाला फक्त ४ गोष्टी लागतील; जवस, मक्याचे पीठ, खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल.
एका पातेल्यात १ ग्लास पाणी उकळून त्यात जवस घाला आणि पाणी पांढरे होईपर्यंत उकळून ते गाळून घ्या. दुसऱ्या पातेल्यात मक्याचे पीठ आणि पाणी मिसळून ते क्रीमी दिसेपर्यंत शिजवा.
शिजवलेले मक्याचे पीठ आणि जवसचे गाळलेले पाणी एकत्र करा. या मिश्रणात २ चमचे खोबरेल तेल आणि १ चमचा ऑलिव्ह तेल मिसळा.
हा तयार केलेला जेल केसांना लावा आणि ४० मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. पहिल्याच वापरात तुम्हाला फरक जाणवेल.