Akshay Nirmale
2022-23 या आर्थिक वर्षात टॅक्स रिफंडचा सरासरी कालावधी घटवून 16 दिवसांवर आणण्यात आला आहे. सन 2021-22 मध्ये हा कालावधी 26 दिवस होता.
ITR फाईल केल्यानंतर आणि ई-व्हेरिफिकेशननंतर रिफंडची प्रक्रिया सुरू होते. विभागाला तुमचा क्लेम योग्य आहे, असे दिसल्यास ई-मेल किंवा एसएमएसद्वारे तुम्हाला रक्कम कळवली जाते.
एसएमएसद्वारे एक रिफंड सीक्वेन्सदेखील पाठवला जातो. इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 143 (1) नुसार ही माहिती करदात्यांना दिली जाते.
स्टेट बँक ऑफ इंडिया रिफंड प्रोसेस करते. करदात्याची रक्कम थेट खात्यात दिली जाते. चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे तुमच्या पत्त्यावरही पाठवले जाऊ शकते.
तुम्हाला तुमचे रिफंड स्टेटस तपासायचे असेल तर ई-फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वैयक्तिक माहितीसह लॉगिन करावे लागेल.
त्यानंतर अकाऊंट सेक्शनवर क्लिक करून रिव्ह्यु रिटर्न्स/फॉर्म्स वर क्लिक करावे लागेल. ड्राप डाऊन मेन्यूतून टॅक्स रिटर्न सिलेक्ट करावे लागेल. वर्ष निवडावे लागेल. अॅकनॉलेज नंबरवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर एक पॉपअप दिसून येईल. त्यावर रिटर्न फायलिंगची टाईमलाईन दिसून येईल. असेसमेंट इयर, स्टेटस, पेमेंट कसे मिळेल, नसेल तर का नाही याचे कारणही कळेल.