Pranali Kodre
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो.
११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या हार्दिकला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड लागली होती. तो आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल एकत्र क्रिकेट खेळायचे.
हार्दिक आणि कृणाल यांनी बडोद्यामध्ये माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले होते.
२०१३ मध्ये आयपीएल खेळण्याआधी हार्दिक आणि कृणाल वेगवेगळ्या शहरात क्रिकेट खेळायला जायचे, ज्यामध्ये त्यांना एका सामन्यात ४००-५०० रुपये मिळायचे. अगदी त्यांनी दिवस मॅगी खाऊनही काढले.
मात्र, त्यानंतर हार्दिकला २०१३ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले आणि त्याचे भविष्य बदलले.
हार्दिकने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. हार्दिकने २०१६ मध्ये भारताकडून पदार्पणही केले.
आता हार्दिक भारताचा टी२० कर्णधार देखील आहे.
हार्दिकने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ११ सामने खेळताना ५३२ धावा केल्या आहेत आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच हार्दिकने ८३ वनडे सामन्यांमध्ये १७६९ धावा केल्या आहेत आणि ८० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ९२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १३४८ धावा केल्या आहेत आणि ७३ विकेट्स घेतल्या आहेत.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने २०२२ चे विजेतेपदही जिंकले.
हार्दिकने आयपीएलमध्ये १२३ सामने खेळले असून २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत.