Pranali Kodre
सचिन तेंडुलकर 24 एप्रिल 2023 ला त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा, धावा करणारा आणि शतके करणारा खेळाडू तर आहेच, पण त्याला आधी गोलंदाज व्हायचे होते.
सचिन तेंडुलकरने 1987 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात बॉल-बॉय म्हणून काम केले होते.
सचिनला गोव्यातील मार्टिन्स कॉर्नर या रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ चाखायला आवडतात.
सचिनला क्रिकेटव्यतिरिक्त टेनिस आणि गोल्फ खेळायलाही आवडते.
सचिन तेंडुलकरचा आवडता टेनिसपटू जॉन मॅकएन्रो असून त्याचमुळे त्याचे लहानपणी टेनिस खेळतानाचे टोपननावही मॅक होते.
सचिनला वडापाव खायला प्रचंड आवडते.
सचिनला विविध पदार्थ बनवायलाही आवडतात. एकदा त्याने संपूर्ण भारतीय संघासाठी भरल्या वांग्याची भाजी बनवली होती.
सचिनने पहिली व्यावसायिक जाहिरात बँडेडसाठी केली होती.
सचिनची पहिली कार मारुती-800 होती.
सचिन त्याच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये 99 क्रमांकाची जर्सी घालायचा.
सचिनचे नाव त्याच्या वडिलांनी संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवले होते.
सचिनने पहिल्यांदा बॅटसाठी 1996 वर्ल्डकपच्या सुरुवातीला करार केला होता.
सचिन श्वानप्रेमी असल्याने त्याने त्याच्या घरीही कुत्र पाळलेले आहे.