WPL मधील पाचही संघांचे मालक कोण आहेत माहितीये का?

Pranali Kodre

पहिल्या महिला आयपीएलला म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगला (WPL) 4 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ सामील होणार असून या संघांची आता अंतिम तयारी सुरू आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या पाचही संघांनी लिलावातून आपली संघबांधणी केली आहे.

WPL 2023 | Dainik Gomantak

दरम्यान, हे पाच संघ विकत घेण्यासाठीही अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी प्रयत्न केले होते.

WPL 2023 Owner | Dainik Gomantak

त्यातील आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन फ्रँचायझी मालकांनीच वूमन्स प्रीमियर लीगमधील अनुक्रमे मुंबई, बेंगलोर आणि दिल्ली या फ्रँचायझी विकत घेतले.

WPL 2023 | Dainik Gomantak

तसेच अहमदाबाद आणि लखनऊ फ्रँचायझी विकत घेणाऱ्या कंपन्या मात्र आयपीएल फ्रँचायझीचे मालक नाहीत.

WPL 2023 | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील मुंबई फ्रँचायझी इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 912.99 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

Mumbai Indians WPL | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील बंगळुरु फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 901 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

Royal Challengers Bangalore WPL | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील दिल्ली फ्रँचायझी जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

Delhi Capitals WPL | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील लखनऊ फ्रँचायझी कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 757 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

UP Warriorz | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील अहमदाबाद फ्रँचायझी सर्वात महागडी ठरली असून या फ्रँचाझीचे मालकी हक्क अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1289 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Gujarat Giants WPL | Dainik Gomantak
MS Dhoni | Virat Kohli | Dainik Gomantak