Pranali Kodre
आयपीएल 2023 स्पर्धेत 20 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केवळ 1 धावेने विजय मिळवला.
पण या सामन्यात कोलकाताकडून 67 धावांची धावांची खेळी करणाऱ्या रिंकू सिंगने एक खणखणीत 110 मीटरचा षटकार मारला.
त्यामुळे त्याचा हा षटकार आयपीएल 2023 मधील पाचव्या क्रमांकाचा सर्वात लांब षटकार ठरला.
आयपीएल 2023 मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम सध्या (20 मे पर्यंत) फाफ डू प्लेसिसच्या नावावर असून त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 115 मीटरचा षटकार लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मारला होता.
आयपीएल 2023 मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सच्या टिम डेव्हिडचा समावेश आहे. त्याने 114 मीटरचा षटकार पंजाब किंग्सविरुद्ध मारला होता.
आयपीएल 2023 मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलर आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 112 मीटरचा षटकार मारला होता.
आयपीएल 2023 मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याच्या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा शिवम दुबे आहे. त्याने 111 मीटर लांब षटकार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मारला होता.