Akshay Nirmale
दामोदर मावजो यांनी कथा, कादंबरी, लघु कथा, पटकथालेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन, निबंध, समीक्षा अशा विविध प्रकारांत लिखाण केले आहे.
सूड (1975) , कार्मेलीन (1981), सुनामी सायमन (2009), जीव दिवं काय च्या मारूं (2020) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत.
मावजो यांच्या कार्मेलीन कादंबरीला 1983 साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कादंबरीचे हिंदी, मराठी, इंग्लिश, पंजाबी, सिंधी, तामिळ, ओरीया, मैथिली असा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
गांथन (1971), जागरणां (1975), रूमडफूल (1981), भुरगीं म्हगेली तीं (2001), समनमोगी (2014), तिश्टावणी (2020) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. These are my Children नावांने त्यांच्या इंग्रजी कथांचे पुस्तक आहे.
पोर्तुगीज राजवटीतून स्वतंत्र झाल्यानंतरच्या गोव्याच्या समाजजीवनातील बदल, चढ-उतार त्यांच्या लिखाणात दिसतात. गोमंतकीय माणसाच्या संघर्षाची संवेदनशील मांडणी त्यांच्या लिखाणात आहे.
योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट निर्णयाचं मार्मिक चित्रण, स्त्री-पुरुष नातेसंबंध, नात्यातील बारकावे त्यांच्या लिखाणात दिसतात.
एकीकडे विदारक वास्तव दाखवून देताना मानवी मूल्यांवरील श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टी अधोरेखित करणारे त्यांचे लिखाण आहे.