Pranali Kodre
आयपीएल 2023 स्पर्धेत 6 मे रोजी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 6 विकेट्सने पराभूत केले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. त्याला दीपक चाहरने बाद केले.
आयपीएल कारकिर्दीत शुन्यावर बाद होण्याची ही रोहितची 16 वी वेळ होती.
त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत (6 मे 2023 पर्यंत) रोहित पहिल्या क्रमांकावर आला आहे.
या नकोशा यादीत रोहितसह दिनेश कार्तिक, सुनील नारायण, मनदीप सिंग हे संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहितसह दिनेश कार्तिक, सुनील नारायण, मनदीप सिंग हे सुद्धा आयपीएलमध्ये प्रत्येकी 15 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अंबाती रायुडू आहे.
अंबाती रायुडू आत्तापर्यंत 14 वेळा आयपीएलमध्ये शुन्यावर बाद झाला आहे.