Akshay Nirmale
वेल्हा गोवा किंवा ओल्ड गोवा येथे मॉन्टे सँटो (होली हिल) वर सेंट ऑगस्टीन टॉवर आणि चर्च कॉम्प्लेक्सचे अवशेष आहेत.
ही वास्तू सध्या भग्नावस्थेत असली तरी अवशेषावरून या वास्तुची भव्यता कळू शकते.
येथील 46 मीटर उंचीचा हा टॉवर आणि येथील अवशेष असलेल्या परिसराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे.
1587 मध्ये गोव्यात आलेल्या ऑगस्टिनियन फ्रायर्स यांनी ही हा टॉवर आणि सेन्होरा दा ग्रासा (अवर लेडी ऑफ ग्रेस) चर्च बांधले.
बांधकाम 1597 मध्ये सुरू झाल्याचे सांगितले जाते. 1602 मध्ये ते पूर्ण झाले.
सेंट ऑगस्टीन टॉवर हा या चर्चचा केंद्रबिंदू होता आणि इमारतीचा भाग म्हणून बांधलेल्या चार टॉवरपैकी एक होता. लॅटराइट दगडापासून हे बांधकाम केले आहे.
टॉवरचा वापर घंटाघर म्हणून केला गेला. चर्चमध्ये आठ सुशोभित चॅपल आणि चार वेद्या, एक कॉन्व्हेंट होते. चर्चमध्ये एक मोठे व्हॉल्टेड छप्पर होते जे दुर्दैवाने 1842 ते 1846 दरम्यान वजनामुळे कोसळले.
टॉवरमध्ये असलेली मोठी घंटा सुरुवातीला 1871 मध्ये आग्वाद किल्ला येथे नेण्यात आली. आता ही घंटा पणजीतील चर्च ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शनमध्ये आहे.
टॉवरसह चर्चचा दर्शनी भाग 1938 मध्ये पुन्हा कोसळला. सध्या पाच मजली उंच टॉवरपैकी जे काही उरले आहे ते सर्व जतन केले गेले आहे. 2004 मध्ये येथे जॉर्जियन राणी केटेवनचे अवशेष सापडले होते.