Pranali Kodre
2 जून 1989 मध्ये जन्मलेला स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो.
स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून पदार्पण केले होते. विशेष म्हणजे त्याच्याकडे प्रमुख फिरकीपटू आणि खालच्या फळीतील फलंदाज म्हणून पाहिले जायचे.
स्मिथकडे सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघात महान फिरकीपटू शेन वॉर्नचा वारसदार म्हणूनही पाहिले जात होते.
स्मिथने 2010 टी20 वर्ल्डकपमध्ये 7 सामन्यांमध्ये 11 विकेट्सही घेतल्या होत्या, त्यावेळी तो सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता.
मात्र, नंतर स्मिथने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली आणि गोलंदाजी मागे पडली.
आजच्या घडीला स्मिथ दिग्गज फलंदाजांपैकी एक असून अधुनिक काळातील सर्वोत्तम चार फलंदाजांपैकी (फॅब फोर) एक त्यालाही समजले जाते.
स्टीव्ह स्मिथने क्रिकेटच्या तीन प्रकारांपैकी कसोटी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली असून त्याची 59.80 इतकी सरासरी आहे. त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वोत्तम फलंदाजही म्हणूनही अनेकदा नावाजले जाते.
स्टीव्ह स्मिथने त्याच्या कारकिर्दीत 96 कसोटी सामने खेळले असून 8792 धावा केल्या आहेत. तसेच 19 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच त्याने 142 वनडेत 4939 धावा केल्या आहेत. याबरोबरच 63 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1008 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 64 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.