Pranali Kodre
बरोबर 58 वर्षांपूर्वी 2 जून 1965 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात स्टीव्ह आणि मार्क या जुळ्या भावांचा वॉ कुटुंबात जन्म झाला होता, ज्यांनी ९० च्या दशकात क्रिकेटविश्व गाजवले.
स्टीव्ह आणि मार्क हे जुळ्या वॉ बंधूनी अनेक वर्षे ऑस्ट्रेलियाकडून एकत्र क्रिकेट खेळले.
स्टीव्ह यांनी 26 डिसेंबर 1985 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर मार्क यांनी 11 डिसेंबर 1988 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
स्टीव्ह आणि मार्क यांची 5 एप्रिल 1991 रोजी एकत्र कसोटी सामना खेळणारी पहिली जुळ्या भावांची जोडी ठरली होती. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध त्रिनिदाद येथे पहिल्यांदा एकत्र कसोटी सामना खेळला.
महत्वाची गोष्ट अशी की मार्क यांना जानेवारी 1991 मध्ये जेव्हा कसोटी पदार्पण केले, तेव्हा त्यांना स्टीव्ह यांच्या जागेवरच ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळाली होती.
स्टीव्ह आणि मार्क यांनी एकत्र तब्बल 108 कसोटी सामने खेळले आहेत.
स्टीव्ह आणि मार्क हे ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या पहिल्या सहा खेळाडूंमध्ये आहेत. स्टीव्ह 18496 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि मार्क 16529 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहेत.
स्टीव्ह यांनी त्यांच्या कारकिर्दीत 168 कसोटी सामने खेळताना 10927 धावा केल्या. तसेच 92 विकेट्स घेतल्या. याशिवाय 325 वनडे सामन्यात 7569 धावा केल्या आणि 195 विकेट्स घेतल्या.
स्टीव्ह यांच्याच नेतृत्वाखाली 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता. ते ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार म्हणूनही ओळखले जातात.
मार्क यांनी कसोटीत 128 सामन्यांमध्ये 8029 धावा केल्या आणि 59 विकेट्स घेतल्या. तसेच वनडेत 244 सामन्यांमध्ये 8500 धावा आणि 85 विकेट्स घेतल्या.