ऐन पस्तीशीत पावणेसहा तास मॅच खेळणाऱ्या Andy Murray बद्दल तुम्हाला माहितीये का?

Pranali Kodre

दिग्गज टेनिसपटू अँटी मरे ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडला. पण असे असले तरी त्याने या स्पर्धेत दाखवलेल्या खेळामुळे तो चर्चेत राहिला.

Andy Murray | Dainik Gomantak

या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याने थानासिस कोक्किनाकीसविरुद्ध पहिले दोन सेट गमावल्यानंतरही अविश्वसनीय खेळ करत पुढीत तीन सेट जिंकत विजय मिळवला होता.

Andy Murray | Dainik Gomantak

तब्बल 5 तास 45 मिनिटे त्याने थानासिसला टक्कर दिली. हा सामना ऑस्ट्रेलियन स्थानिक वेळेनुसार पाहाटे 04.05 मिनिटांनी संपला. ऑस्ट्रेलियन ओपनमधील सर्वाधिक काळ चालेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सामना ठरला.

Andy Murray | Dainik Gomantak

या सामन्यानंतर मरेने दिलेल्या लढतीचे कौतुक सर्वच स्तरातून झाले. पण या सामन्यानंतर तो पूर्ण रिकव्हर झाला नाही आणि अखेर तिसऱ्या फेरीतून बाहेर झाला.

Andy Murray | Dainik Gomantak

35 वर्षीय मरेचा जन्म स्कॉटलंडमध्ये 15 मे 1987 साली झाला.

Andy Murray | Dainik Gomantak

त्याच्या घरातूनच त्याला खेळाचे बाळकडू मिळाले. त्याची आई टेनिसपटू होती, त्याचे आजोबाही फुटबॉल खेळायचे. तो आणि त्याचा मोठा भाऊ जेमी यांनीही पुढे जाऊन टेनिसमध्ये करियर केले.

Andy Murray with Mother | Dainik Gomantak

मरे एकेरीत खेळण्याबरोबरच त्याच्या भावाबरोबर दुहेरी सामनेही खेळतो.

Andy Murray with Brother | Dainik Gomantak

मरेने त्याच्या कारकिर्दीत तीन ग्रँडस्लॅम, दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके, डेविस कप विजेतेपद मिळवले आहे. तो जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही राहिलेला खेळाडू आहे.

Andy Murray | Dainik Gomantak

पण, मरेसाठी सर्वात मोठी समस्या त्याच्या दुखापती ठरल्या. त्याच्या जन्मजातच गुडघ्यातील होडे जोडले असण्याऐवजी विभक्त झालेली आहेत. त्याच्यावर गुडघ्यांवर अनेक शस्त्रक्रियाही झाल्या आहेत.

Andy Murray | Dainik Gomantak

तसेच त्याच्या नितंबात मेटल प्लेटही टाकण्यात आली आहे. 2019 साली त्याने दुखापतींच्या कारणाने निवृत्ती घेण्याचाही विचार केला होता.

Andy Murray | Dainik Gomantak

मात्र, त्याने नंतर टेनिसमध्ये पुनरागमन करत पुन्हा त्याचा खेळ दाखवला.

Andy Murray | Dainik Gomantak

मरे या युगातील रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यासह सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो.

Andy Murray | Dainik Gomantak

त्याला 2017 साली ब्रिटिश सरकारकडून 'नाईटहूड'चा बहुमान देण्यात आला होता.

Andy Murray | Dainik Gomantak

तो उत्तम बिझनेसमन देखील आहे. त्याची हॉटेल बिझनेसमध्ये स्पोट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये गुंतवणूकही आहे. तसेच तो अनेक कंपनींचा ब्रँड अँबेसिडरही आहे.

Andy Murray | Dainik Gomantak

त्याने किम रिअर्सबरोबर लग्न केले असून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.

Andy Murray with Wife | Dainik Gomantak
Cheteshwar Pujara | Dainik Gomantak