SRH vs LSG साठी मॅचविनर ठरलेला प्रेरक मंकड आहे तरी कोण?

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 13 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

Prerak Mankad | www.iplt20.com

लखनऊच्या या विजयात प्रेरक मंकडने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने 45 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 64 धावांची खेळी केली.

Prerak Mankad | www.iplt20.com

तो यापूर्वी केवळ दोन आयपीएल सामने खेळला आहे. त्याला पंजाब किंग्सने आयपीएल 2022 लिलावात 20 लाखांच्या किमतीत खरेदी केले होते.

Prerak Mankad | www.iplt20.com

पण त्याला आयपीएल 2023 लिलावापूर्वी पंजाबने संघातून मुक्त केले. त्यामुळे लखनऊने त्याला आयपीएल 2023 लिलावात 20 लाखांमध्येच खरेदी केले.

Prerak Mankad | www.iplt20.com

प्रेरक देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळतो. 2022-23 हंगामाची विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या सौराष्ट्र संघाचाही तो प्रमुख खेळाडू होता.

Prerak Mankad | www.iplt20.com

त्याने 2016 सालीच प्रथम श्रेणी क्रिकेट आणि टी20 क्रिकेटमध्ये सौराष्ट्रासाठी पदार्पण केले होते, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 2017 मध्ये पदार्पण केले.

Prerak Mankad | Twitter

अष्टपैलू खेळाडू असलेल्या प्रेरकने 46 प्रथम श्रेणी सामन्यांत 1 शतक आणि 14 अर्धशतकांसह 2006 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 43 विकेट्स घेतल्या आहेत.

Prerak Mankad | Twitter

त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 53 सामन्यांमध्ये 3 शतके आणि 7 अर्धशतकांसह 1535 धावा केल्या आहेत. तसेच 38 विकेट्स घेतल्या आहेत.

Prerak Mankad | Twitter

प्रेरकने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत (13 मे 2023 पर्यंत) 44 टी20 सामनेही खेळले असून 8 अर्धशतकांसह 941 धावा केल्या आहेत आणि 22 विकेट्स घेतल्या आहेत.

Prerak Mankad | Twitter

तो अनेकदा आयपीएल 2023 मध्ये बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसला आहे.

Prerak Mankad | www.iplt20.com
Suryakumar Yadav | Dainik Gomantak