Pranali Kodre
आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा आयपीएलचा 16 वा हंगाम आहे.
आत्तापर्यंत 15 आयपीएल हंगाम खेळवले गेले असून 7 संघांनी विजेतेपद जिंकले आहे.
सर्वाधिकवेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. त्यांनी 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा पाच वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.
तसेच मुंबई पाठोपाठ चेन्नई सुपर किेग्स संघाने 2010, 2011, 2018 आणि 2021 असे चारवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 असे दोन हंगामात आयपीएलची विजेतीपदे जिंकली आहेत.
या तीन संघांव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात जायंट्स या चार संघानी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद जिंकले आहे.
राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा सर्वात पहिल्या हंगामाचे म्हणजेच 2008 साली विजेतेपद जिंकले आहे.
डेक्कन चार्जर्सने 2009 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
सनरायझर्स हैदराबादने 2016 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
गुजराज टायटन्सने त्यांचा पहिलाच हंगाम खेळताना 2022 साली आयपीएल विजेतेपद जिंकले.