Pranali Kodre
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने 14 ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला.
गंभीर भारताच्या दोन विश्वविजयाचा भाग राहिला आहे. त्याने भारताकडून 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकली आहे.
गंभीरने 2007 टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये 75 धावांची खेळी केली, तसेच 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये 97 धावांची खेळी केली होती.
दिल्लीमध्ये जन्मलेल्या गंभीरने 2003 ते 2016 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
गंभीरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 58 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 शतकांचा आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.
गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 147 वनडे आणि 37 टी20 सामनेही खेळले आहेत. त्याने वनडेत 11 शतकांसह 5238 धावा केल्या आहेत, तर टी20मध्ये 932 धावा केल्या आहेत.
गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपदही मिळवले.
गंभीरने आयपीएलमध्ये 154 सामने खेळताना 4217 धावा केल्या, यात 36 अर्धशतकांचा समावेश आहे.
गंभीर खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर राजकारणाकडे वळाला. तो सध्या दिल्लीत खासदार आहे.
तसेच गंभीर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर म्हणून काम पाहातो. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचनही करताना दिसतो.