Akshay Nirmale
सेलिंग-विंडसर्फिंग हा समुद्राच्या लाटांवर बोटींतून थरार आजमावण्याचा साहसी क्रीडा प्रकार आहे. यात गोव्याच्या पर्ल कोलवाळकर हीने कमी वयात स्वतःचा ठसा उमटवला आहे.
सागरी नौकानयन किंवा सेलर या क्रीडा प्रकारात गोव्याची पर्ल कोलवाळकर हीने अल्पावधीतच भारताची आघाडीची सेलर-विंडसर्फर म्हणून लौकिक प्राप्त केला आहे.
2020 मध्ये तिला केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविले होते. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते तिचा सन्मान झाला होता.
पर्लला सेलिंगसोबतच संगितातही रूची आहे. ती पाश्चिमात्य क्लासिकल पियानो आणि गिटार वादन शिकली आहे.
दोन वर्षांपासून ती विंडसर्फिग करत आहे. राष्ट्रीय पातळीवर पर्लने 12 पदके जिंकली आहेत.
पोर्तुगाल, स्पेन, पट्टाया, पोलंड, अबुधाबी, ग्रीस, थायलंड, इटली येथील स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली होती.
सध्या पर्ल भारतीय संघाच्या आयएलसीए फोर प्रकारातील मुलींत दुसऱ्या स्थानी तर आयएलसीए सिक्स प्रकारात तिसऱ्या क्रमांकाची सेलर आहे.