शिवाजी महाराजांनी जिंकला होता गोव्यातील 'हा' किल्ला...

Akshay Nirmale

मुख्य रस्त्यालगत किल्ला

पणजी-फोंडा मुख्य मार्गावरच फोंडा बस स्थानकापासून जवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नुतणीकरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज किल्ला असे या किल्ल्याचे नाव आहे.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak

आकर्षक रंगसंगती

महाराष्ट्रातील किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला भव्य नाही. तथापि, याच्या रंगसंगतीमुळे लांबूनच हा किल्ला लक्ष वेधून घेतो.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak

अश्वारूढ पुतळा

किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak

बांधकाम

हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहाने 16 व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करताना या किल्ल्यावरही हल्ला चढविला होता. पण तेव्हा यश आले नाही. तथापि, 1675 साली जोरदार आक्रमणानंतर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak

संभाजी महाराज

पोर्तुगीजांनी फितुरीने हा किल्ला परत मिळवला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्यासह हल्ला करून हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak

जवळची तीर्थक्षेत्रे

मंगेशी, म्हार्दोळ येथील सुप्रसिद्ध मंदिरे या किल्ल्यापासून जवळ आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच खेपेत ही तिन्ही पर्यटन स्थळे पाहता येतात.

Ferumagudi Fort, Ponda, Goa | Dainik Gomantak
St. Augustine Tower, Old Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...