Pranali Kodre
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले.
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत केले.
या विजयासह पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमधीलही विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले आहे.
त्यामुळे पॅट कमिन्स आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा सहावा कर्णधार ठरला.
ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक 4 आयसीसी विजेतीपदे रिकी पाँटिंगने जिंकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 वनडे वर्ल्डकप व 2006 आणि 2009 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
ऍलेन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सर्वात पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1987 साली वर्ल्डकप जिंकला.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज म्हणून ओळखल्या गेलेल्या स्टीव्ह वॉ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1999 साली वनडे वर्ल्डकप जिंकला होता.
माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2015 साली मायदेशात झालेला वनडे वर्ल्डकप जिंकला होता.
ऍरॉन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलियाने 2021 साली टी20 वर्ल्डकप विजेतेपदाला गवसणी घातली होती.