IPL मध्ये एकाच आठवड्यात 'या' 5 खेळाडूंची शतके

Pranali Kodre

SRH vs RCB

आयपीएल 2023 मध्ये 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला.

SRH vs RCB | www.iplt20.com

एकाच सामन्यात 2 शतके

या सामन्यात तब्बल दोन शतके पाहायला मिळाली. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने आणि बेंगलोरकडून विराट कोहलीने शतक केले.

Virat Kohli | www.iplt20.com

हेन्रिक क्लासेन

क्लासेनच्या 104 धावांच्या शतकाच्या जोरावर हैदराबाजदने 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या होत्या.

Heinrich Klaasen | www.iplt20.com

विराट कोहली

त्यानंतर 187 धावांचा यशस्वी पाठलाग करत बेंगलोरला विजय मिळवून देताना विराटने 100 धावांची शतकी खेळी केली.

Virat Kohli | www.iplt20.com

एका आठवड्यात 5 शतके

विशेष म्हणजे 12 ते 18 मे या सात दिवसातील आयपीएलमध्ये तब्बल 5 शतके झाली आहेत.

Heinrich Klaasen | www.iplt20.com

सूर्यकुमार यादव

12 मे रोजी मुंबई इंडियन्सकडून गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना सूर्यकुमार यादवने 103 धावांची खेळी केली होती.

Suryakumar Yadav | www.iplt20.com

प्रभसिमरन सिंग

13 मे रोजी पंजाब किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रभसिमरन सिंगने 103 धावांची खेळी केली होती.

Prabhsimran Singh | www.iplt20.com

शुभमन गिल

गुजरात टायटन्सकडून खेळताना 15 मे रोजी शुभमन गिलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 101 धावांची खेळी केलेली.

Shubman Gill | www.iplt20.com

आठ शतके

दरम्यान, आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत एकूण 8 शतके झाली आहेत. एप्रिल महिन्यात हॅरी ब्रुक (100), वेंकटेश अय्यर (104) आणि यशस्वी जयस्वाल (124) यांनी शतके केली होती.

Yashasvi Jaiswal | www.iplt20.com
Hardik Pandya | Dainik Gomantak