Pranali Kodre
भारताचे माजी अष्टपैलू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री 27 मे रोजी त्यांच्या 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
रवी शास्त्रींंनी वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेटकडे गंभीरतेने पाहायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली 1977 मध्ये डॉन बॉस्को शाळेने आंतर शालेय जाईल्स शिल्ड स्पर्धा जिंकली होती.
शास्त्रींची वयाच्या 17 व्या वर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड झाली होती. त्यावेळी मुंबई संघात निवड झालेले ते सर्वात युवा खेळाडू होते.
शास्त्रींची जेव्हा दिलीप जोशींच्या जागेवर न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली होती, तेव्हा ते कॉलेजमध्ये होते. विशेष म्हणजे या दौऱ्यातून वेलिंग्टन कसोटीत शास्त्रींनी पदार्पण करत 6 विकेट्ही घेतल्या होत्या.
शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लेग स्पिनर म्हणून केलेली, तसेच ते 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करायचे. पण कसोटी पदार्पणाच्या साधारण दीड वर्षानंतर शास्त्री यांना फलंदाजी क्रमवारीत बढती मिळाली आणि मग ते सलामीलाही नियमित फलंदाजी करू लागले.
शास्त्री 1983 सालच्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होते.
शास्त्री यांना 1985 साली वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ क्रिकेट स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला, ज्यावेळी त्यांना ऑडी 100 सेडन कार बक्षीस म्हणून मिळालेली.
शास्त्री यांनी 1985 साली रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना केवळ 113 मिनिटात द्विशतक केले होते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम केलेला. त्याच सामन्यात त्यांनी एकाच षटकात 6 षटकारही मारलेले.
शास्त्री यांनी टीम इंडियाकडून 80 कसोटी सामने खेळले असून 3830 धावा केल्या, तसेच 151 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर 150 वनडे सामने खेळताना 3108 धावा केल्या आणि 129 विकेट्स घेतल्या. त्यांनी 15 आंतरराष्ट्रीय शतकेही केली आहेत.
रवी शास्त्री यांनी 2014 मध्ये टीम इंडियाचे संचालक म्हणून जबाबदारी स्विकारली. त्यानंतर ते 2017 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले. त्यांनी ही जबाबदारी 4 वर्षे सांभाळली.
रवी शास्त्री यांनी 1990 साली रितू सिंग यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांना 2008 मध्ये मुलगी झाली, जिचे आलेखा नाव आहे. पण त्यानंतर 2012 मध्ये शास्त्री आणि रितू सिंग वेगळे झाले.