Photo: भगवान मंजुनाथाच्या दर्शनाला KL Rahul

Pranali Kodre

केएल राहुलची मंदिराला भेट

भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज केएल राहुलने नुकतीच कर्नाटकमधील श्री क्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट दिली.

KL Rahul | Instagram

भगवान मंजुनाथांचं दर्शन

इथे केएल राहुलने भगवान शिवाच्या नावांपैकी एक असलेल्या भगवान मंजुनाथाची प्रार्थना केली.

KL Rahul | Instagram

पोषाख

यावेळी केएल राहुलने पारंपारिक पोषाख परिधान केल्याचे दिसत आहे.

KL Rahul | Instagram

महाकालेश्वरचेही दर्शन

यापूर्वी मार्चमध्ये केएल राहुलने पत्नी आथिया शेट्टीबरोबर उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरालाही भेट दिली होती.

KL Rahul | Instagram

दुखापत

दरम्यान, केएल राहुल सध्या मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे.

KL Rahul | Instagram

शस्त्रक्रिया

आयपीएल 2023 स्पर्धा खेळत असताना केएल राहुल दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या उजव्या मांडीवर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

KL Rahul | Instagram

शस्त्रक्रियेनंतरची प्रतिक्रिया

त्यामुळे केएल राहुल सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये या शस्त्रक्रियेनंतरच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे.

KL Rahul | Instagram

वेस्ट इंडिज दौरा

याच दुखापतीमुळे त्याला कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकावे लागले होते. तसेच आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यालाही तो मुकणार आहे.

KL Rahul | Instagram

आशिया चषकालाही मुकणार?

याशिवाय तो 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकालाही या दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

KL Rahul | Instagram
Suresh Raina | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी