Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 8 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा 5 वा सामना पार पडला. चेन्नईत पार पडलेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या या विजयात केएल राहुलचे योगदान यष्टीरक्षक फलंदाज म्हणून महत्त्वाचे राहिले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 2 धावांत आणि 2 षटकांच्या आत पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या.
पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अनुक्रमे 85 आणि नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले.
या खेळीमुळे केएल राहुल वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वोच्च खेळी करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
केएल राहुलने एमएस धोनीने 2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात केलेल्या नाबाद 91 धांवांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
वर्ल्डकपमध्ये सर्वोच्च खेळी करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर राहुल द्रविड आहे. द्रविडने 1999 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची खेळी केलेली.
दरम्यान, केएल राहुलने या यादीत दुसरा क्रमांक मिळवल्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर धोनीचेच नाव आहे.
धोनीची 2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील नाबाद 91 धावांची खेळी तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर 2015 वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद 85 धावांची खेळी चौथ्या क्रमांकावर आणि 2015 वर्ल्डकपमध्येच उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची 65 धावांची खेळी पाचव्या क्रमांकावर आहे.