Kavya Powar
वास्तूशास्त्रानुसार आपल्या किचनची अंतर्गत रचना व्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे.
वास्तूनुसार घरातील अग्नि तत्वाच्या आग्नेय दिशेला स्वयंपाकघर बांधावे.
जर तुमच्या घरातील स्वयंपाकघर वास्तूनुसार इतर कोणत्याही दिशेला बांधलेले नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणतीही तोडफोड न करता वास्तुनुसार स्वयंपाकघराची अंतर्गत व्यवस्था करून वास्तूतील दोष दूर करू शकता.
पिण्याचे पाणी साठवण्यासाठी आणि हात धुण्यासाठी नळ ईशान्य कोपऱ्यात असावा.
भांडी धुण्यासाठी उत्तर-पश्चिम दिशा शुभ मानली जाते. आग्नेय कोपऱ्यात टोस्टर, गिझर किंवा मायक्रोवेव्ह, ओव्हन ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मिक्सर, ज्युसर इत्यादी दक्षिणेला आग्नेय कोपर्याजवळ ठेवणे शुभ मानले जाते, जर रेफ्रिजरेटर स्वयंपाकघरात ठेवायचा असेल तर ते दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा
वास्तुनुसार मसाल्याचा डबा, भांडी, तांदूळ, डाळी, पीठ इत्यादींचे बॉक्स दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे.
सिलिंडर दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात आणि वापरलेले सिलिंडर दक्षिणेकडे ठेवा.