Kavya Powar
ज्या लोकांची किडनी कमकुवत झाली आहे, डॉक्टर त्यांना जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यास मनाई करतात. कारण प्रोटीन फूड अशा लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.
जर एखाद्याची किडनी कमकुवत झाली असेल, तर त्याने जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याची काळजी घ्यावी.
कारण किडनीचे काम प्रथिनांपासून बनलेले विषारी पदार्थ शरीराबाहेर काढणे आहे. पण किडनी खराब झाल्यास ती नीट काम करू शकत नाही.
किडनीचे काम शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी काढून टाकणे आहे. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा ती नीट काम करू शकत नाही.
अशा स्थितीत जर आपण जास्त प्रथिने खाल्ल्यास प्रथिनांच्या विघटनाने तयार होणारे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ किडनी फिल्टर करू शकत नाही.
हे विषारी पदार्थ किडनीमध्ये जमा होऊन किडनीला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी आपल्या आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी ठेवावे.
त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रथिनांचे सेवन करावे. जास्त प्रथिनांचे सेवन केल्यास किडनीवर दबाव वाढून ते खराब होऊ शकते.