भारतातील ही पक्षी अभयारण्ये पाहिलीयत का?

Rahul sadolikar

सुलतानपूर पक्षी अभयारण्य ( हरियाणा)

गुरुग्रामपासुन अगदी जवळच असणारं सुलतानपूर पक्षी अभयारण्य...इथे 250 हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत.

Sultanpur Bird Sanctuary | Dainik Gomantak

केवलादेव पक्षी अभयारण्य ( राजस्थान)

राजस्थानमधील केवलादेव पक्षी अभयारण्य हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. इथे 360 हुन अधिक प्रजातींचे पक्षी तुम्ही पाहू शकता..

Kevladeo National Park | Dainik Gomantak

कुमारकोम पक्षी अभयारण्य

केरळमधील या अभयारण्यात प्रसिद्ध वेंबनाड तलाव आहे. सायबेरियन स्टॉर्क आणि किंगफिशर या पक्ष्यांचे हे अभयारण्य निवासस्थान आहे.

Kumarkoam Bird Sanctuary | Dainik Gomantak

रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य, कर्नाटक

कर्नाटकातील सगळ्यात जुनं म्हणून ओळखलं जाणारं हे अभयारण्यात 222 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.

Rangnathittu bird sanctuary | Dainik Gomantak

ओखला पक्षी अभयारण्य, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात असणारं ओखला पक्षी अभयारण्य जगभरातल्या पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इथे तुम्हाला कबुतर, लाल मुनिया आणि स्पॉट बिल्ड बदके पाहायला मिळतील.

Okhla Bird Sanctuary | Dainik Gomantak

नलबाना पक्षी अभयारण्य, ओडिशा

नलबाना पक्षी अभयारण्य हे ओडिशातील चिलीका सरोवराचा भाग आहे. 1972 साली झालेल्या कायद्यानुसार हे क्षेत्र पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आलं.

Nalbana Bird Sanctuary | Dainik Gomantak

नल सरोवर पक्षी अभयारण्य

अहमदाबादपासुन 60 किलोमीटर अंतरावर असणारं नल सरोवर पक्षी अभयारण्य भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे.

Nal Sarovar Bird Sanctuary | Dainik Gomantak

वाघ, सिंह, बिबट्या या बिग कॅटसबद्दल तुम्हाला माहितेय का?

Big Cats | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी