Konkan Tourism: निळं पाणी आणि हिरवा डोंगर... कशेळीचा हा सुंदर 'बटरफ्लाय बीच' तुमचं मन जिंकेल!

Sameer Amunekar

कशेळी बीच

कशेळी या बीचचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे इथे पोहोचण्यासाठी आधी डोंगर उतरावा लागतो. कारण हा समुद्र किनारा दोन डोंगरांच्या कपारीत लपलेला आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

दोन डोंगरांच्या मध्ये वसलेला सिक्रेट बीच

कशेळी बीच पूर्णपणे निसर्गाच्या कवेत आहे. दोन्ही बाजूंनी उंच डोंगर आणि समोर अथांग समुद्र – दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

गोव्याच्या बटरफ्लाय बीचसारखा आकार

या बीचचा आकार अगदी बटरफ्लाय (फुलपाखरू) सारखा असून त्यामुळे तो गोव्याच्या प्रसिद्ध बटरफ्लाय बीचची आठवण करून देतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

गर्दीपासून दूर

इथे अजूनही फारशी पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे शांतता, एकांत आणि निसर्गप्रेमींना हा बीच स्वर्गासारखा वाटतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

सनसेट पॉईंट

कशेळी गावातील देवघळी बीचचा सनसेट पॉईंट सध्या हळूहळू फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन बनत आहे. सूर्यास्ताचा सोनेरी रंग इथे पाहायलाच हवा.

Konkan Tourism | Dainik Gomantak

समुद्राचे विहंगम दृश्य

कशेळीच्या टेबल पॉईंटवरून समुद्राचे विहंगम दर्शन होते. फोटोग्राफी प्रेमींंसाठी हा पॉईंट खास आकर्षण आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

सुंदर समुद्र किनारा

स्वच्छ पाणी, नैसर्गिक रचना, डोंगर-समुद्राचा संगम यामुळे कशेळी बीच हा कोकणातील सर्वात सुंदर सिक्रेट बीचपैकी एक मानला जातो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

'बोर्डी'चे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच मोहित करेल

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा