Akshata Chhatre
अभिनेत्री करिना कपूरने अलीकडेच आपल्या व्हेकेशनमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये करिना स्किन आणि ब्लॅक रंगाच्या मोनोकनीमध्ये दिसत आहे.
करिनाचा हा सिजलिंग लुक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
मात्र या फोटोंमध्ये करिनाचे थोडेसे पोट बाहेर आलेले दिसल्यामुळे सोशल मीडियावर करिनाच्या प्रेग्नंसीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
अनेक युजर्सनी कमेंट करत विचारलं “करिना पुन्हा प्रेग्नंट आहे का?” तर काहींनी लिहिलं “प्रेग्नंट वाटतेय.” करिनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले असून या दोघांना दोन मुलं आहेत – तैमुर आणि जेह अली खान.
तैमुर आणि जेह हे दोघंही सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या गोंडस फोटोंना नेहमीच चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळते.