Kapil Sharma ने पत्नीसोबत साजरा केला दिवाळीचा सण

गोमन्तक डिजिटल टीम

एका फोटोमध्ये कपिल पत्नी गिन्नीच्या ओढणीच्या आड लपताना दिसत आहे.

दिवाळीनिमित्त आयोजित एका पार्टीत कपिल शर्मा पत्नी गिन्नीला किस करताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्माचे पत्नी गिन्नी सोबत दिवाळीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, कपल गुलाबी पोशाखात दिसत आहेत.

दिवाळीनिमित्त काढलेल्या या फोटो दोघेही हसताना दिसत असून, दोघांची बॉन्डिंग खूपच क्यूट दिसत आहे.

दिवाळीला कॉमेडी किंगने हलक्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर, गिन्नीही बीन कलरच्या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे.

अलीकडेच कपिल शर्माने बॉलीवूडच्या एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली जिथे त्याने पत्नी गिन्नीला प्रेमाने किस केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

कपिल आणि गिन्नी 12 डिसेंबर 2018 रोजी विवाहबद्ध झाले. कॉलेजच्या काळापासून कपिलचे गिन्नीवर प्रेम होते.

Goa | Dainik Gomantak
क्लिक करा