Pranali Kodre
कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 25 जून 1983 रोजी इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानात वर्ल्डकपवर नाव कोरले होते.
हे वर्ल्डकपचे एकूण तिसरे पर्व होते. तसेच या वर्ल्डकपमधील सामने 60-60 षटकांचे झाले होते. यापूर्वीचे दोन्ही वर्ल्डकप वेस्ट इंडिजने जिंकले होते.
भारतीय संघाने अंतिम सामन्यात दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाला 43 धावांनी पराभूत केले होते.
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 54.4 षटकात सर्वबाद 183 धावा केल्या होत्या. त्यानंतर 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 52 षटकात 140 धावांवर सर्वबाद झाला होता
अंतिम सामन्यात अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ सामनावीर ठरले होत.
अमरनाथ यांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 27 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्यातील कपिल देव यांनी मदन लाल यांच्या गोलंदाजीवर मागे पळत जाऊन पकडलेला विव रिचर्ड्स यांचा झेल महत्त्वपूर्ण ठरला होता.
हा भारतीय क्रिकेटमधील पहिला विश्वविजय ठरला होता. या विश्वविजयाने सचिन तेंडुलकरबरोबरच अनेक क्रिकेटपटूंना प्रेरित केले होते.