Pranali Kodre
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन 8 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
अनेकांना हे माहित नसेल की केन विलियम्सनला जुळा भाऊही आहे आणि ते दोघे एकत्र वाढदिवस साजरेही करतात.
केन विलियम्सनच्या जुळ्या भावाचे नाव लोगन आहे. तो अकाउंटंट असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते.
केन आणि लोगन यांच्यात चांगले बाँडिंगही असून अनेक रिपोर्ट्सनुसार दोघेही लहानपणी खेळात चांगले होते.
लहानपणी केन विलियम्सन रग्बी या खेळातही चांगला होता. तसेच त्याला सर्फिंगही आवडते.
केन आणि लोगन यांना तीन मोठ्या बहिणीही असून त्या देखील विविध स्तरावर व्हॉलीबॉल खेळल्या आहेत.
विलियम्सनच्या लाईफ पार्टनरचे नाव साराह असून ती पेशाने नर्स आहे.
केन आणि साराह यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी मॅगीचा जन्म डिसेंबर 2020 मध्ये झाला, तर मुलाचा जन्म मे 2022 मध्ये झाला होता.