Pramod Yadav
गुढी पाडव्यादिवशी साखळी पर्ये येथे सप्तशती देवीचा कलशोत्सव साजरा केला जातो.
यात देवीचा कलश तयार करून दोन गड्यांच्या डोक्यावर दिला जातो.
दोन गडी हा कलश डोक्यावर घेऊन अनवानी पर्ये ते साखळी असा प्रवास करतात.
ढोल ताशांच्या गजरात हा कलश हजरत बाबर पीर येथील दर्गावर घेऊन जातात.
या दर्गामध्ये तेथील मौलाना कौल घेतात
हा कलशोत्सव पाचशे वर्षाची जुनी परंपरा आहे.
मुस्लिम लोकांनी कलशावर फुलांचा वर्षाव केल्याशिवाय ही पायी यात्रा पुढे जात नाही.
हिंदू मुस्लिम एकतेचे हे अनोखे प्रतिक आहे. जे मागील पाचशे वर्षापासून गोव्यात जिवंत आहे.