Akshay Nirmale
पणजीतील कदंबा बस स्टँडपासून हा किल्ला 23 किलोमीटर अंतरावर आहे. मार्शेल येथील सुप्रसिद्ध रवळनाथ देवस्थानापासून हा किल्ला अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे.
जुवे किल्ल्यावर सेंट इस्तेवाम चर्च देखील आहे. 1575 मध्ये हे चर्च बांधले गेल्याची माहिती आहे.
पुर्वी जुवे हा भाग भाज्यांच बेट म्हणून ओळखले जात होते.
जुवे हे गोव्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. या बेटाच्या भोवतीने नदी वाहते.
पुर्वी हा किल्ला सभोवताली जंगलाने वेढलेला होता. आता येथे सभोवताली बरीच घरे झाली आहेत.
आकाराने या किल्ल्याचा मुख्य भाग लहान आहे. तथापि, येथे एक सुरक्षारक्षक वगळता कुणीही नसते.
या किल्ल्याला भवतीने संरक्षणभिंत किंवा कुंपण करून त्याचे जतन करणे गरजेचे आहे.