Akshata Chhatre
सध्या हवामान सतत बदलतंय. कधी कडक ऊन, कधी थंडी, कधी दमट हवा. त्यात ऑयली स्किनवाल्यांना तर कायम एकच चिंता चेहऱ्याची चिकटपणा, ब्लॅकहेड्स, पिंपल्स.
कोणी महागडी फेशियल्स करतो, कोणी हजारो रुपयांचे क्लीन्सर वापरतो. पण याचा परिणाम तात्पुरताच!
आपल्या किचनमध्ये रोज दिसणारी गोष्ट बर्फ फक्त दोन वेळा, काही मिनिटं रोज बर्फाचा स्पर्श चेहऱ्याला करा आणि पहा बदल
ऑयली स्किनमुळे चेहरा चिकट, मळकट दिसतो. बर्फ चेहऱ्यावरील रोमछिद्रं तात्पुरती बंद करतो, ज्यामुळे तेल कमी स्रवतं.
झोपेचा अभाव, ताण, थकवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. बर्फाने हलकं मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढतं, त्वचेला ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात मिळतो.
घरातून बाहेर पडताना किंवा एखाद्या खास प्रसंगापूर्वी चेहरा बर्फाच्या पाण्याने धुवा त्वचेतील रक्तप्रवाह वाढून त्वचेला नैसर्गिक उजळपणा येतो.