Ashutosh Masgaunde
MRF ने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून सुमारे 8400 पट म्हणजेच 84350 टक्के परतावा दिला आहे. एप्रिल 1993 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता, त्या दिवशी तो रु.11 वर बंद झाला होता.
1993 शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजेच 27 वर्षात या शेअरने 92450 रुपये किंमत गाठत उच्चांक नोंदवला होता.
MRF चे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी (MRF) आहे. त्याची पायाभरणी 1946 मध्ये झाली. आज शेअर बाजारातील MRF स्टॉक हा सर्वात महागडा स्टॉक आहे. MRF स्टॉकने नुकतेच एक लाख रुपयांपर्यंत झेप घेतली आहे.
एमआरएफने 1962 मध्ये टायर्सचे उत्पादन सुरू केले. 1964 मध्ये, MRF टायर्सची अमेरिकेत निर्यात सुरू झाली. आज एमआरएफची मार्केट कॅप 38747 कोटी रुपये झाले आहे.
MRF ही 1967 मध्ये अमेरिकेत टायर निर्यात करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली. 1984 मध्ये, देशातील पहिली आधुनिक कार मारुती सुझुकी 800 मध्ये देखील MRF टायर होते.
सध्या MRF अमेरिका, युरोप, मिडल इस्ट आणि जपानसह 65 हून अधिक देशांमध्ये टायर निर्यात करते. त्याची सध्या दुबई, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया येथे परदेशात कार्यालये आहेत.
1993 मध्ये एमआरएफ चे संस्थापक के एम मम्मन मॅप्पिलई यांना त्यांच्या उद्योगातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तोपर्यंत हा सन्मान मिळवणारे दक्षिण भारतातील एकमेव उद्योगपती होते.