हाडांमधून आवाज येतोय? फक्त गोळ्यांवर अवलंबून राहू नका

Akshata Chhatre

कॅल्शियम

हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी फक्त कॅल्शियमच्या गोळ्यांवर अवलंबून राहणं पुरेसं नाही. आपल्या रोजच्या आहारात नैसर्गिकरित्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिजांनी भरलेले पदार्थ समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे.

joint cracking sound| why do bones crack | Dainik Gomantak

मॅग्नेशियम

वयानुसार शरीराला दररोज सुमारे ७०० ते १३०० मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते, आणि ही गरज अन्नातूनच पूर्ण करणं सर्वोत्तम ठरतं. हाडांच्या मजबुतीसाठी ब्राऊन राईस, ओट्स आणि क्विनोआसारखी तृणधान्यं फायदेशीर ठरतात, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं.

joint cracking sound| why do bones crack | Dainik Gomantak

फोर्टिफाइड पर्याय

दूध, दही, चीज ही पारंपरिक कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ आहेत पण त्याशिवाय सोया, ओट किंवा बदाम दुधासारखे फोर्टिफाइड पर्याय देखील उपलब्ध आहेत.

joint cracking sound| why do bones crack | Dainik Gomantak

हाडांची ताकद

बदाम, तीळ, अळशी आणि सूर्यफूल बिया लहान वाटतात, पण त्यामध्ये आवश्यक खनिजे, निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या बिया नियमित आहारात टॉपिंग म्हणून किंवा नाश्त्यामध्ये खाल्ल्यास हाडांची ताकद वाढते आणि सूजही कमी होते.

joint cracking sound| why do bones crack | Dainik Gomantak

योग्य पदार्थांचा समावेश

तुम्ही पूरक गोळ्यांवर विसंबून न राहता तुमच्या रोजच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास हाडं निरोगी ठेवणं शक्य आहे.

joint cracking sound| why do bones crack | Dainik Gomantak

प्रभावी आणि सुरक्षित

अन्नातून मिळणारी पोषणमूल्यं अधिक प्रभावी आणि सुरक्षित असतात, त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी हीच सवय लावून घेणं केव्हाही चांगलं.

joint cracking sound| why do bones crack | Dainik Gomantak
आणखीन बघा