'गोल्डन बॉय' नीरजच्या शिरपेचात मानाचा तुरा

Pranali Kodre

सुवर्ण पदक

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 27 ऑगस्ट रोजी रात्री वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

Neeraj Chopra | Twitter

सुवर्णमय कामगिरी

अंतिम फेरीत त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर भाला फेकला. ही कामगिरी त्याला सुवर्ण पदक मिळवून देण्यास पुरेशी ठरली.

Neeraj Chopra | Twitter

इतिहास घडला

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

Neeraj Chopra | Twitter

तिसरे पदक

नीरजने 27 ऑगस्ट रोजी जिंकलेले वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमधील भारताचे वैयक्तिक तिसरेच पदक ठरले आहे, तर पहिलेच सुवर्णपदक आहे.

Neeraj Chopra | Twitter

भारताची पदके

नीरजने गेल्यावर्षी युजिनला झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. त्याआधी 2005 साली अंजू बॉबी जॉर्जने महिला लांब उडीमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

Neeraj Chopra | Twitter

ऑलिम्पिक गोल्ड

नीरज भारताला ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात सुवर्णपदक जिंकून देणारा पहिलाच भारतीय खेळाडूही आहे.

Neeraj Chopra | Twitter

गोल्डन बॉय

नीरजने गेल्या अनेक वर्षांपासून उत्तरोत्तर त्यांची कामगिरी उंचावत नेली असून त्याने अनेकदा भारताला गौरवान्वित करणारी कामगिरी नोंदवली आहे.

Neeraj Chopra | Twitter

रौप्य आणि कांस्य पदक

दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी नीरजपाठोपाठ पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकीसह रौप्य पदक जिंकले, तर चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने 86.67 मीटर भाला फेक करत कांस्य पदक जिंकले.

Arshad Nadeem | Twitter
India Relay Team | Dainik Gomantak