Pranali Kodre
18 ऑगस्ट 2023 रोजी डब्लिनला आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमारहच्या नेतृत्वातील भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २ धावांनी विजय मिळवला.
याच सामन्यातून बुमराहने टी20 कर्णधार म्हणून पदार्पण केले. तो भारताचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा 11 वा कर्णधार ठरला. (आकडेवारी 18 ऑगस्ट 2023 पर्यंत).
भारताचे सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने नेतृत्व केले होते. त्याने 1 सामन्यात नेतृत्व केले असून भारताने हा सामना जिंकला होता.
सेहवागनंतर एमएस धोनीने नेतृत्वाची धूरा जवळपास 10 वर्षे सांभाळली. त्याने 72 टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना 41 विजय मिळवले, तर 28 पराभव पत्करले. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आणि 2 सामन्यांचे निकाल लागले नाही.
सुरेश रैनाने 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून तिन्ही सामने जिंकले आहेत.
अंजिंक्य रहाणेला भारताचे 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याने 1 विजय आणि 1 पराभव स्विकारला.
विराट कोहलीने धोनीनंतर भारताचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्विकारले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने 50 टी20 सामने खेळताना 30 विजय, 16 पराभव आणि 2 बरोबरी स्विकारली. तसेच 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.
विराटनंतर रोहित शर्मा भारताचा नियमित कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात भारताने 51 टी20 सामने खेळताना 39 विजय आणि 12 पराभव स्विकारले.
शिखर धवनने भारताचे 3 टी20 सामन्यात नेतृत्व केले, ज्यातील 1 सामना त्याने जिंकला, तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारताने खेळलेल्या 5 टी20 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले, तर 2 सामने पराभूत झाले, 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
हार्दिक पंड्याने 16 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून 10 विजय मिळवले आहेत आणि 5 पराभव स्विकारले आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
केएल राहुलने भारताचे एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेतृत्व केले असून विजय मिळवला आहे.