Manish Jadhav
जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आज (16 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून जांभूळ सेवनाच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत...
जांभळामध्ये जम्बोलिन आणि जंबोसिन नावाचे घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेही रुग्णांना जांभळाचे नियमित सेवन करावे.
जांभूळ पचनक्रिया सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी जरुर जांभळाचे सेवन करावे.
जांभळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
जांभूळ रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.