Akshata Chhatre
हिवाळ्यात गुळाचा चविष्ट आणि गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच असते
तो चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो.
पण अनेकदा गुळाचा चहा बनवताना एकच समस्या येते तो फाटतो., पण हे सत्य नाही.Jaggery Tea Trick|Kitchen Hacks
अनेकांना वाटतं की हे केवळ गुळामुळे होतं, पण हे सत्य नाही. यामागे दोन महत्त्वाच्या चुका आहेत.
तुमचा चहा कधीही खराब होऊ नये आणि अगदी कडक व परिपूर्ण व्हावा यासाठी, योग्य रेसिपी फॉलो करणे आवश्यक आहे.
गुळाचा चहा कडक आणि मसालेदार बनवण्यासाठी हे साहित्य घ्या: १ चमचा गूळ,१ चमचा चहाची पाने, १ कप दूध (गरम केलेले) ,३ काळी मिरी, २ हिरव्या वेलची, छोटा आल्याचा तुकडा, १ कप पाणी
पाणी उकळल्यावर त्यात गूळ, चहाची पाने आणि तयार केलेला मसाला घाला. गूळ पूर्णपणे वितळू द्या आणि चहाला चांगली उकळी येऊ द्या. जेव्हा गूळ आणि चहाचा अर्क व्यवस्थित उकळत असेल, तेव्हा त्यात उकळलेले गरम दूध घाला.