Pramod Yadav
जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित 'ओपनहायमर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
अणुबॉंबचे जनक असलेल्या जे. रॉपर्ट ओपेनहायमर यांचा प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे.
ओपेनहायमर हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे.
हॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
'ओपनहायमर' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 10 पैकी 9 रेटिंग मिळाले आहे.
अभिनेता सिलियन मर्फी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा ओपेनहायमर यांची पहिली अणुचाचणी 'ट्रिनिटी'बद्दल भाष्य करणारा आहे.
दोन दिवसांत या सिनेमाने जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट उत्कृष्ट झाल्याने सर्वत्र स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.