Akshay Nirmale
गोव्यात आत्तापर्यंत 32 गायींना लम्पी झाल्याचे गोव्याचे पशुपालन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले आहे.
लम्पीची लागण झालेल्या गायींना गोव्यात विलगीकरणात ठेवले जाणार आहे.
त्यासाठी सिकेरी-डिचोलीतील गोशाळेजवळ स्वतंत्र विभाग तयार केला गेला आहे.
कमलाकांत तारी ही गोशाळा चालवत आहेत.
या विभागात लम्पीग्रस्त गायींवर उपचार करण्यात येणार आहेत.
सरकारकडून या गोशाळेला शक्य ती मदत केली जाणार आहे.
याशिवाय आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टर्सही नेमले आहेत.